निरवांगी ६ ऑक्टोंबर २०२०:इंदापूर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. निमित्त बेटी बचाव, बेटी पढाव अभियान राबविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी मुलींचा आत्मविश्वास वाढवा यासाठी भाषणात अनेक उदाहरणं सांगितल्यानं मुलींमध्ये उत्साह दिसत होता.
इंदापूर तालुक्यातील बिट २ निरवांगी निमसाखर येथील अंगणवाडी केंद्रांनी एकत्र येत निरवांगी येथे मुलींसाठीच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन सोनाली पोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच किशोरी मुलींच्या वेगवेगळ्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेऊन त्यांना पाहुण्यांनी प्रोत्साहनपर भाषण व मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय मुंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी उज्वला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. बिट पर्यवेक्षीका एन. एस. तांबोळी, अंगणवाडी सेविका सुवर्णा कुलकर्णी आशा स्वयंसेवीका विजया बोबडे व बिट मधील सर्व सेविका तसेच मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव