चाईल्ड पॉर्न विरोधात सीबीआय चे युनिट

नवी दिल्ली: इंटरनेट मुळे जसा दैनंदिन जीवनात फायदा होत आहे त्याचप्रमाणे काही लोकांकडून त्याचा गैरफायदा घेत असल्याचेही दिसून येत आहे. सरकारने पॉर्न साईट वर बंदी आणली असताना समाजातील काही लोकांकडून याचा विरोधही करण्यात आला होता: परंतु या साईट मधून बाललैंगिक शोषणाचे ही प्रकार दिसून येत आहे.
इंटरनेटवरील चाईल्ड पॉर्न चा वाढता प्रभाव आणि बाल लैंगिक शोषणाला पायाबंद घालण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने पुढाकार घेतला असून यासाठी वेगळा विभागच तयार करण्यात आला आहे. बाल लैंगिक शोषण तसेच हिंसाचार प्रतिबंध आणि चौकशी विभाग असे या युनिटचे नामकरण करण्यात आले आहे. इंटरनेटवर चाईल्ड पॉर्न चा प्रसार करणाऱ्या तसेच हे पॉर्न पाहणाऱ्या आणि त्यासंबंधीच्या क्लिप्स डाऊनलोड करणार्‍यांवर देखील या विभागांचे लक्ष असेल. या प्रकरणांमध्ये दोषी आढळलेल्यावर पॉक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा