गाव पातळीवर होणारे बालविवाह बाल संरक्षण समितीने थांबवावेत- ज्ञानेश्वर काळे

लातूर १० मार्च २०२४ : “कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन” यांच्या सहकार्यातून व लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून, गाव पातळीवर होणारे बालविवाह बाल संरक्षण समितीने थांबवावेत असे आवाहन समितीचे जिल्हा व्यवस्थापक ज्ञानेश्वर काळे यांनी केलय. बालविवाह मुक्त भारत ग्रामस्तरीय क्षमता बांधणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या शिबिरात ते बोलत होते.

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील समूहामध्ये प्रामुख्याने बालविवाह, बाल वाहतूक, बालकामगार व बाल लैंगिक शोषण यासारख्या अत्यंत प्रखरतेने भेडसावत असलेल्या, तसेच बालकांशी संबंधित इतर अनेकविध समस्या विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजनाचा कृती कार्यक्रमाचा अवलंब करणेबाबत विविध माध्यमातून जनजागृती करणे, प्रबोधन, प्रशिक्षण, कार्यशाळा, ग्राम बाल संरक्षण समितीच्या नियमित बैठका घेणे, शालेय समितीच्या बैठका घेणे, शोषित बालक व त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन होण्याकरिता शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे. इत्यादी कृती कार्यक्रम हाती घेतले आहेत.

बालविवाह मुक्त भारत ग्रामस्तरीय क्षमता बांधणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेवेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लातूर जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक माननीय सुधाकर देडे साहेब उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालकल्याण समितीचे अध्यक्ष ऍड. राधाकृष्ण देशमुख सर उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून माननीय महिला बाल विकास अधिकारी जावेद शेख तर बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे. प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ऍड. संजयजी सेंगर. त्याचबरोबर बालकल्याण समिती सदस्य श्री प्रणिल नागुरे, संगीता महालिंगे,ऍड स्वाती तोडकरी, ऍड. महादेव झुंजे, माझी बालकल्याण समिती सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऍड. श्रीमती सुजाता माने, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती अनिता माने तसेच लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर काळे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री शिवाजीराव पाटील यांनी केली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्षेत्रिय अधिकारी तुळशीदास सोळंके यांनी मांडले यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रीती आगासे, अजय घाडगे, पूजा झुंजे, रंजना पोलकर, सविता सूर्यवंशी, मोहिनी कांबळे, सारिका कांबळे सर्व उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा