बालपणीचा विनोद खरा ठरला

Childhood fears and myths
बालपणीचा विनोद खरा ठरला

तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।

Childhood fears and myths: संत तुकाराम महाराज आपल्या या प्रसिद्ध अभंगात देवाला विनंती करीत आहेत, “हे पांडुरंगा, मला ह्या संसारातील जो व्यक्ती सर्वात लहान आहे त्याहून लहान बनव, तू मला लहानपण दे. बालपण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. या कालावधीत घडलेल्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतात. लहानपणी व्यक्तीला काहीही चिंता राहत नाही. खेळकुद आणि शाळेच्या मस्तीत संपूर्ण वेळ जातो.

लहानपणात आपण आई- वडिलांचं ऐकावं त्यांना सांगितलेलं करावा आणि खास करून जे आपल्या साठी वाईट आहे अशा गोष्टी पासून सांभाळून सहावं या साठी ते अनेक मार्गांचा अवलंब करतात, पण त्यात एक प्रकार होता भीती दाखवण्याचं म्हणजे लवकर झोप नाही तर म्हसोबा येतो , जेवण नीट कर नाही तर जादूगार उचलून नेतो , दात तुटला कि पत्रावर ताक म्हणजे नवीन दात येतो , आणि अशा प्रमारें अजून के पोटात जर कोणत्या झाडाचं बीज केलं तर म्हणजे पोटातून झाड बाहेर येत हे सगळं तुम्ही देखील लहान असताना अनुभवलं असेलच त्या माघे कारण काय ते आपण जसे मोठे झालो तस आपल्याला समजलं कि व्यवस्तीत पद्धतीने शांततेने आणि नीट-नाटके पणाने आपण ते फळ खावे या साठी ते म्हणायचे बरोबर पण जर आज मी तुम्हाला म्हणाले कि लहान पणीची हि भीती आज खार झाली आहे तर म्हणजे खरच शरीरात झाड आलं तर ??

वैद्यकीय इतिहासात एक दुर्मिळ घटना समोर आली आहे, ज्यामध्ये बीज पोटात नाही तर फुफ्फुसात अंकुरले होते.तुमच्या लहानपणी, अशा काही मिथक आहेत, ज्या बालपणी आपल्याला घाबरवण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी सांगितल्या जातात.पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का होत नाही? जर नसेल, तर या वस्तुस्थितीमागील सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

पोटात झाड का वाढत नाही?

एखादे बीज आपल्या पोटात गेले तरी त्यांचे पोटात लहान तुकडे होतात आणि त्यातून कोणताही नुकसान आपल्याला हो नाही. पोटात वाढणाऱ्या वनस्पतीची चर्चा देखील चुकीची आहे कारण बीजाच्या अंकुर वाढण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परिस्थिती तिथे उपलब्ध नसते, जसे की प्रकाश, ऑक्सिजन आणि पोषक तत्वे. पोटातील आम्ल देखील अंकुरण्याची प्रक्रिया थांबवते. मानवी शरीरात एक पचनसंस्था असते जी अन्न तोडते आणि ते शोषून घेते, ज्यामुळे बिया देखील तुटतात आणि वनस्पती वाढत नाही. याशिवाय, बियांना अंकुर वाढण्यासाठी वेळ लागतो, तर मानवी शरीरात अन्न काही तासांत पचते.

फुफ्फुसात वाढणारी वनस्पती

तथापि, वैद्यकीय इतिहासात एक दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये बीज पोटात नाही तर फुफ्फुसात अंकुरित झाले होते. ही घटना अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका निवृत्त शिक्षकाला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि जेव्हा तो डॉक्टरकडे गेला आणि त्याच्या फुफ्फुसांचे स्कॅनिंग केले तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. तपासणीत असे दिसून आले की त्याच्या फुफ्फुसात वाटाण्याचे रोप वाढत होते, जे डॉक्टरांनी नंतर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले.

न्यूज अनकट प्रतिनिधी,ऐश्वर्या शिलवंत