गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

ठाणे : भिवंडीतील कारिवली ग्रामपंचायत येथील सुभाषनगर या परिसरात आठ वर्षाच्या अल्पवयीन मूलीचे एका अज्ञात नराधमाने अपहरण केल्याची घटना घडली आहे.
शनिवारी (दि.२१) रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घराबाहेर खेळत होती. त्यानंतर ती आईस्क्रीम घेण्यासाठी आईस्क्रीम विकणाऱ्या गाडीजवळ गेली. त्यावेळी तिचे एका अज्ञात नराधमाने अपहरण केले. त्यानंतर तो नराधम तीला घरी पासून ५० ते ६० मीटर दूर असणाऱ्या मोकळ्या जागेत घेऊन गेला. तेथील जागेत असलेल्या झुडपात तिच्यावर बलात्कार केला.परंतु तो नराधम तेवढ्यावरच न थांबता त्याने त्या चिमुरडीची डोक्यात दगड घालून हत्या केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री साडेनऊ वाजल्यापासून मुलगी घरी आलेली नसल्याने तिच्या आईवडिलांनी रात्री दोन वाजेपर्यंत तिचा शोध घेतला. मात्र मुलीचा शोध काही लागत नसल्याने तिच्या घरच्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास त्या मोकळ्या जागेत शौचास गेलेल्या व्यक्तिने झुडपात त्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह पाहीला आणि तातडीने ही बाब त्या चिमुकलीच्या घरी कळवली. मुलीचा मृतदेह पाहून तिच्या घरच्यांनी हंबरडा फोडला. आपल्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराला पाहून त्या आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्या मुलीच्या आईने केली.
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला तसेच आरोपीच्या विरोधात काही ठोस पुरावे देखील पोलीसांच्या हाती लागले आहेत. लवकरच आरोपीला अटक करू अशा प्रकारचा विश्वास पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!
Exit mobile version