गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

जामखेड : जामखेड शहरातील कान्होपात्रानगर येथे राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचाराची केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपी सचिन शालन पवार याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाच वर्षांची चिमुरडी शाळेतून आल्यानंतर दुपारी तीन वाजता शेजारी राहणारा आरोपी सचिन शालन पवार याच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. आरोपीने तिला उचलून घेत बाजूच्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आईला सांगितले तर तुम्हाला मारून टाकीन, अशी धमकी आरोपी सचिनने चिमुरडीला दिली.
ही घटना मंगळवार २१ तारखेला घडली होती. फिर्याद दाखल होऊ नये, त्यासाठी मुलींच्या आईवर दबाव आणल्याची माहिती पुढे येत आहे. शेवटी आईने आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
अत्याचार झालेली पिडीत मुलगी जखमी झाली आहे. सदर घडलेला प्रकार मिटवण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु पिडीत मुलीच्या आईने धाडसाने २ दिवसांनंतर फिर्याद दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सचिनला अटक केली असून, सहायक निरीक्षक निलेश कांबळे अधिक तपास करीत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version