अरुणाचल प्रदेश, ९ सप्टेंबर २०२०: अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच तरुणांविषयी मोठी माहिती समोर आली आहे. तेजपुरचे डिफेन्स पीआरओ लेफ्टिनेंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी सांगितले की २ सप्टेंबर २०२० रोजी, अनवधानाने काही युवक दुसऱ्या बाजूला म्हणजेच चीनच्या बाजूला गेले होते. त्यांचा तपास आता लागला आहे. भारताच्या या पाच तरुणांनी चुकून एलएएसी ओलांडली. चिनी सैन्याने मंगळवारी कबूल केले की भारतातील पाच बेपत्ता तरुण त्यांच्या बाजूला सापडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी चिनी सैन्याकडे औपचारिकता पूर्ण केली जात आहे.
त्याच वेळी, या अगोदर केंद्रीय मंत्री आणि अरुणाचल प्रदेशचे खासदार किरेन रिजिजू यांनीही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) अरुणाचल प्रदेशातील पाच बेपत्ता तरुणांना भेटल्याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, तरुणांना आमच्या अधिकाराच्या स्वाधीन करण्याचे काम केले जात आहे.
हे तरुण सैन्यात हमालाचे काम करायचे
अरुणाचल प्रदेशातील नाचो भागातील पाच ग्रामीण तरुण जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते, पीएलएने त्यांना ताब्यात घेतले होते. या तरुणांनी लष्करासाठी हमाल व गाईड म्हणून काम केले. शुक्रवारी त्यांच्या कुटूंबियांनी सोशल मीडियावर त्यांच्या गायब झाल्याची माहिती दिली होती. या गटाचे दोन सदस्य घरी परतले आणि उर्वरित पाच तरुणांच्या कुटुंबियांना सांगितले की चीनी सैन्याने त्यांना सेरा -७ मधून नेले आहे. नाचो हे मॅकमोहन लाईनजवळील शेवटचे प्रशासकीय परिक्षेत्र आहे आणि ते डापोरिजोच्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १२० किमी अंतरावर आहे.
चीनी सैन्यदलाने ज्यांचे अपहरण केले होते, त्यांची नावे टोच सिंगकाम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू इबिया, तनु बाकर आणि एन. दिरी अशी आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे