चीनवर बहिष्काराची मागणी असताना चीनने ‘या’ बँकेत खरेदी केली हिस्सेदारी

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट २०२०: देशातील चिनी वस्तूंवर बहिष्कार आणि चीनविरोधी वातावरणादरम्यान, पीपल्स बँक ऑफ चायनाने आयसीआयसीआय बँकेत हिस्सेदारी विकत घेतल्याची बातमी समोर आली आहे. तथापि, यामुळं देशाच्या संरक्षणाला कोणताही धोका नसल्याचं तज्ञांचं मत आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये, चीनच्या मध्यवर्ती बँकेनं एचडीएफसीमधील आपली गुंतवणूक १ टक्क्यांहून अधिक वाढवली होती. त्यानंतर या विषयावरून बरीच चर्चाही झाली होती. बँक ऑफ चायना म्युच्युअल फंड, विमा कंपन्यांसह त्या ३५७ संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये सहभागी आहे. ज्यांनी नुकतेच आयसीआयसीआय बँकेच्या क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआईपी) ऑफर मध्ये १५,००० कोटींची गुंतवणूक केली आहे. आयसीआयसीआय बँकेने भांडवल उभारण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या आठवड्यातच त्यांनी ठरवलेलं लक्ष पूर्ण झालं आहे.

किती आहे चिनी बँकेची गुंतवणूक

आयसीआयसीआयमध्ये चीनच्या मध्यवर्ती बँकेनं केवळ १५ कोटींची गुंतवणूक केली असून ही गुंतवणूक पात्र संस्थागत प्लेसमेंटद्वारे केली गेली आहे.  इतर परदेशी गुंतवणूकदारांमध्ये सिंगापूर सरकार, मॉर्गन इनव्हेस्टमेंट, सोशिएट जनरल इत्यादींचा समावेश आहे.

तज्ञांचं म्हणणं आहे, की बँकिंग हा भारतातील एक अतिशय नियमन केलेला व्यवसाय आहे, जो रिझर्व्ह बँकेच्या काटेकोर देखरेखीखाली आहे. त्यामुळे त्याचा राष्ट्रीय हितसंबंधात कोणताही धोका होऊ शकत नाही. याआधी चीनच्या या मध्यवर्ती बँकेच्या गृह कर्ज कंपनी एचडीएफसी लिमिटेड मधील गुंतवणूकीवर मागील वर्षी खूप गदारोळ झाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा