हिमाचल प्रदेशच्या सीमेलगत चीनने बनवला २० किमी लांबीचा रोड

शिमला, दि. २६ जुलै २०२०: भारत आणि चीन यांच्यामध्ये लडाख भागामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हिंसात्मक चकमक झाली होती. ज्यामध्ये वीस भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर उभय देशांकडून तणाव कमी करण्यासाठी चर्चासत्र सुरू होते. मात्र आता चीनने पुन्हा एकदा नवीन वाद समोर आणला आहे. हिमाचल प्रदेशला लागून असलेल्या भारत – चीन सीमेवर आता रस्ता बनवला आहे. हिमाचल प्रदेशम धील किन्नौर जिल्ह्यातील कुन्नू चारंग हे शेवटचे सीमावर्ती गाव आहे. कुन्नू चारंगच्या ग्रामस्थांनी चीनच्या प्रदेशात रेकी केल्यावर दावा केला आहे की गेल्या दोन महिन्यांत चीनने सीमेवर सुमारे २० किलोमीटर रस्ता बनविला आहे.

मोरंग व्हॅली भागातील शेवटचे गाव कुन्नू चारंग या गावकऱ्यांचा असा दावा आहे की चीन रात्रीच्या अंधारात वेगाने खेमकुल्ला खिंडीकडे रस्ता बनवित आहे. रात्री चीनमधून ड्रोनही येत आहेत. नो मेन्स लँडमध्ये चीनच्या दिशेने बनविण्यात येणाऱ्या रस्ता बांधण्याचा अंदाज लोकांनी व्यक्त केला आहे. त्याच वेळी किन्नौरचे पोलिस अधीक्षक (एसपी) सजू राम राणा यांनी सीमावर्ती गावांमध्ये ड्रोनच्या आगमनाची पुष्टी केली. रस्ताबांधणी संदर्भात ते म्हणाले की, इतका लांब रस्ता थोड्या वेळात बांधता येत नाही. या संदर्भात ग्रामस्थांनी माहिती दिली असल्याचे एसपी म्हणाले. भारतीय सीमा क्षेत्रात असे काही घडत नाही. घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचवेळी कुन्नू चारंग गावचे प्रमुख म्हणाले की, काही गावकरी खेमकुला येथे गेले होते आणि रेकी करून येथे आल्यानंतर त्यांनी सीमेवरील रस्ता बांधल्याची माहिती दिली.

ते म्हणाले की, इतका लांब रस्ता रात्रभरात तयार होणार नाही. हे बरेच महिने बांधले गेले असावे. याबाबत ग्रामस्थांनी सुरक्षा यंत्रणांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चीन सीमेजवळ कुन्नू चारंग गाव आहे. येथे जाण्यासाठी चांगला रस्ताही नाही. गावकऱ्यांकडे मोबाईल आहेत, पण कनेक्टिव्हिटी अभावी लोकांना बोलण्यासाठी १४ किलोमीटर लांब जावे लागते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा