गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय चीनमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता

चीनमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता

बीजिंग : सध्या जागतिक लोकसंख्येच्या एकूण एक तृतीयांश लोक म्हणजेच २६० कोटी लोक सध्या लॉकडाऊनमध्ये आहेत. त्यामागील कारण म्हणजे कोरोना व्हायरस. याचे उगमस्थान म्हणजे चीनमधील वुहान शहर.
या महामारीकडे चीनने कमालीचे दुर्लक्ष केले असल्याचे अनेक विश्लेषक आणि संशोधकांचे मत आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या व्हायरसला हाताळण्याबाबत पाहिजे तसा प्रतिसाद दिला नसल्याबद्दल नुकतीच चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या एका गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत एका संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार तसेच चीनमधील लोकप्रिय प्लॅटफार्म असलेल्या “वी चॅट” या ब्लॉग ने एक मॅसेज जारी केला आहे. त्या ब्लॉगमध्ये त्यांच्याविरुद्ध बंड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिनपिंग यांच्या कामगिरीबाबत मूल्यांकन करण्यासाठी पोलित ब्युरोची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी एका खुल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
तसेच २५ सदस्सीय पॉलिट ब्युरो हा कम्युनिस्ट पार्टी चालवितो.
चीनच्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध या गटाचे म्हणणे आहे की शी ने चूक केली आहे.
त्यांनी यापुढेही चीनचे नेतृत्व करावे काय याबाबत फेरविचार करावा. याबाबत माहिती देण्यात आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version