चीन, 12 मे 2022: चीनमधील चोंगकिंगमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील विमानतळावर तिबेट एअरलाइन्सचे विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवर घसरले. त्यामुळे विमानाला आग लागली. घटनेच्या वेळी विमानात 113 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स उपस्थित होते.
टेकऑफच्या वेळी आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विमानातील सर्व 113 प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवाशांना किरकोळ दुखापतही झाली आहे.
हे विमान चोंगकिंगहून नानयिंगचीला जात होते. त्यानंतर टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. यानंतर विमानाला आग लागली. मात्र, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
तिबेट एअरलाइन्स ही ल्हासा येथील प्रादेशिक विमान कंपनी आहे. Airfleets.net नुसार, त्यात एकूण 39 विमाने आहेत, ज्यात 28 A319 विमाने आहेत.
चीनमध्ये 2 महिन्यांपूर्वी झाला होता भीषण अपघात
याआधी दोन महिन्यांपूर्वी चीनमध्ये भीषण अपघात झाला होता. येथे चीनच्या इस्टर्न एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. गुआंगशी झुआंग येथे हा अपघात झाला. या अपघातात 132 जणांचा मृत्यू झाला. विमानात 123 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे