तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा टोला – आम्ही कोणाचं स्वागत करायचं हे चीनने सांगू नये

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२२: अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी अलीकडेच तैवानला भेट दिली. त्यांच्या भेटीपासून चीनमध्ये खळबळ उडालीय. चीनने तैवानला चारही बाजूंनी घेरलंच नाही तर थेट फायर ड्रिलही करत आहे. दरम्यान, तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला स्पष्ट शब्दांत सुनावलंय की, तैवानने कोणाचं स्वागत करावं आणि कोणाचं करू नये, अशा सूचना चीन आम्हाला देऊ शकत नाही.

तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू म्हणाले की, चीनकडून आम्हाला धोका पूर्वीपेक्षा खूपच वाढला आहे. पण तरीही आम्ही आमच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ठाम राहू. वू म्हणाले की, चीन नेहमीच तैवानला धमकावत आहे आणि गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झालीय. ते म्हणाले की, यूएस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट द्यावी की नाही, तैवानला चिनी लष्कराकडून धमकी नेहमीच दिली गेली आहे. हे एक संकट आहे ज्याचा सामना करण्याची आपल्याला नितांत गरज आहे.

परराष्ट्र मंत्री जोसेफ वू म्हणाले की, चीन कोणत्याही परिस्थितीत तैवानला सांगू शकत नाही की आम्ही कोणाचं स्वागत करतो आणि कोणाचं नाही. खरंच, तैवानने गेल्या आठवड्यात यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या नेतृत्वाखालील यूएस काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या भेटीचं स्वागत केलं आणि म्हटलं की ही भेट पुन्हा एकदा तैवानसाठी अमेरिकेची ठोस वचनबद्धता अधोरेखित करते.

चीन सातत्याने करत आहे लाइव्ह फायर ड्रिल

दोन दशकांत नॅन्सी पेलोसी यांची तैवानची ही पहिली भेट होती. पेलोसीच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर चीनने तैवानजवळ अनेक लष्करी सराव सुरू केले. गेल्या काही दिवसांत १०० हून अधिक चिनी लढाऊ विमाने आणि १० युद्धनौकांनी तैवानभोवती थेट फायर ड्रिल केले. तैवानच्या आसपास अनेक चिनी विमाने आणि जहाजे दिसली आहेत. अलीकडेच तैवानने म्हटलंय की चीन मुख्य बेटावर सतत हल्ले करत आहे.

‘चीन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे’

जोसेफ वू म्हणतात की त्यांना काळजी वाटते की चीन खरोखर तैवानविरूद्ध युद्ध करू शकेल. पण तो आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याला सामोरे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्याला चीनलाही सांगावं लागंल की आपण घाबरत नाही.

‘आमचं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही’

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तैवानच्या आसपासच्या किमान सहा भागात संयुक्त सराव सुरू केला, जो रविवारी संपणार होता. परंतु चिनी सैन्याने सोमवारी सांगितलं की ते तैवानजवळ सराव सुरू ठेवतील. याला उत्तर देताना तैवानचे परराष्ट्र मंत्री वू म्हणाले की, चीनने तैवानवर कब्जा करण्यासाठी बळाचा वापर करण्याचे ठरवले आहे याची खात्री नाही. परराष्ट्र मंत्री जोसेफ वू म्हणाले की, आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याची गरज आहे. आम्ही येथे उपभोगत असलेले स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं रक्षण करायचंय आणि ते आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा