गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय १९९३ व ९६ कराराचे चीनकडून उल्लंघन ; भारत चोख उत्तरास तयार –...

१९९३ व ९६ कराराचे चीनकडून उल्लंघन ; भारत चोख उत्तरास तयार – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२० : भारत आणि चीन सीमेवरील स्थितीबाबत दोन्ही देशांमध्ये १९९३ आणि ९६ साली महत्वाचे करार झाले आहेत, तथापि चीनकडून या कराराचे उल्लंघन झाले आहेत. चीनने तेथे मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली आहे. या आव्हानात्मक स्थितीला भारताकडून चोख प्रतुत्तर दिले जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे.

चीनसीमेवरील स्थितीबाबत त्यांनी आज राज्यसभेत सविस्तर निवेदन केले. ते म्हणाले की दोन्ही देशातील सीमाविषयी दोन्ही देशांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. तथापि प्रत्यक्ष ताबा रेषेचा दोन्ही देशांनी सन्मान राखावा असे ठरले असताना चीनकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही.

लडाखच्या पेंगाँग भागात चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला परंतु भारतीय सैनिकांनी तो हाणून पाडल्याचं सिंग यांनी नमूद केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला जर कितीही कठोर भूमिका घ्यावी लागली तर आम्ही बिलकुल मागं हटणार नाही अशी ग्वाहीही राजनाथसिंह यांनी यावेळी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version