चीनचे हवाईदल भारतावर कितपत प्रभावी ठरू शकते

पुणे, दि. २१ जून २०२० : लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भ्याड कृत्य केल्याने देशभर चीन विरूद्ध नाराजी आहे. चिनी सैन्याच्या या कपट कारस्थानाला योग्य उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान एलएसीवर प्रत्येक कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. मिराज २००० असो वा सुखोई, अपाचे हेलिकॉप्टर असो किंवा चिनूक प्रत्येकाचे सीमेवरती चोख लक्ष आहे आणि भारतीय वायुसेनेची संपूर्ण शक्ती यावेळी उच्च सतर्कतेवर कार्यरत आहे.

एलएसीच्या ग्राउंड झिरोवर जमिनी पासून ते आसमंतापर्यंत सर्व ठिकाणी भारतीय वायुसेनेचे चोख लक्ष आहे आणि चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल पूर्णपणे तयार आहे. हैदराबादमधील हवाई दलाच्या पासिंग आऊट परेडमध्ये हवाई दलाच्या प्रमुखांनी असेही म्हटले होते की भारत कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार आहे आणि सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

जर युद्धजन्य परिस्थिती ओढावलीच तर हे जाणून घेणे गरजेचे आहे की, भारतीय आणि चिनी वायुसेना यांच्यात कोण ताकतवर आहे आणि कोणत्या वायुसेनेकडे जास्त प्रभावी शस्त्र आहेत. भारतीय वायुसेनेला कोणत्याही परिस्थितीत चीनला चकित करता येईल कारण भारतीय हवाई दलाला उंचावर उड्डाण करण्याचा प्रचंड अनुभव आहे.

लडाखमध्ये भारताने लढाऊ विमान मिरज २००० तैनात केले आहे. बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये हेच लढाऊ विमान वापरले गेले होते. सुखोई -३० देखील सतर्क आहे. भारताचे लढाऊ हेलिकॉप्टर सीमेवर सातत्याने नजर ठेवत आहेत. अपाचे हेलिकॉप्टर एल.ए.सी. वर सुरू असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. सर्व सैनिक आणि शस्त्रे चिनुक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सीमेवर पाठवले जात आहेत. एमआय -१७ व्ही ५ हेलिकॉप्टर देखील अत्यावश्यक वस्तूंसह सतत उड्डाण करत आहे.

भारताच्या वेस्टर्न एअर कमांड मध्ये ७५ लढाऊ विमान आणि ३४ ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट (हवेतून जमिनीवर मारा करणारे) आहेत. ते श्रीनगर, लेह, पठाणकोट, आदमपूर आणि अंबाला येथे तैनात आहेत. सेंट्रल एअर कमांड म्हणजे बरेली, ग्वाल्हेर आणि गोरखपूर सेक्टरमध्ये ९४ लढाऊ विमान आणि ३४ ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट आहेत. या व्यतिरिक्त ईस्टर्न एअर कमांड म्हणजेच जलपाईगुडी, तेजपूर आणि छाबुआ सेक्टरमध्ये १०१ लढाऊ विमान आहेत.

चीनबद्दल बोलताना चीनची हवाई शक्ती वेगवेगळ्या भागात तैनात नाही. चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांड मध्ये १५७ लढाऊ विमान आणि त्यासह अचूक ध्येय गाठणारे २० यूएव्ही आहेत. यामध्ये १२ ग्राउंड अटॅक यूएव्ही आणि ८ ईए -०३ यूएव्ही आहेत.

चीनकडे १०४ अणू क्षेपणास्त्र असून ती संपूर्ण भारतावर हल्ला करू शकतात, तर भारताकडे अग्नि ३ लाँचर यंत्रणा आहे जी चीनमध्ये कोठेही हल्ला करू शकते.

चीनकडे ११,००० आणि ७,००० किमी क्षमतेच्या इंटरकॉन्टिनेंटल बैलिस्टिक मिसाइल आहेत. ही क्षेपणास्त्रे केवळ भारतच नव्हे तर पूर्ण अमेरिका देखील व्यापू शकतात. डीएफ -२१ क्षेपणास्त्राची श्रेणी २१५० किमी आहे आणि याद्वारे चीन दिल्लीला सहज रित्या लक्ष्य करू शकतो. याशिवाय ईशान्य भारत आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अण्वस्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता चीनमध्ये आहे.

भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारताकडे परमाणु क्षमतेचे ५१ लढाऊ विमाने आहेत. त्याचबरोबर भारत अग्नि २ लाँचरद्वारे चीनच्या अनेक भागाला लक्ष्य करू शकतो.

भारत आणि चीनच्या हवाई शक्तीबद्दल बोलतांना चीन एकाच वेळी भारतीय हवाई संरक्षणाशी स्पर्धा करू शकत नाही. चीन जवळ जरी लांब पल्ल्याचे मारक क्षमता असलेले क्षेपणास्त्रे असले तरी यांचा मुकाबला करण्यासाठी भारताकडे हवाई संरक्षण करण्यासाठी अनेक प्रणाली उपलब्ध आहेत. जसे की पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टम, जी भारतीय बनावटीची आधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आहे.

याचबरोबर भारताने इतर देशांतून देखील या प्रणाली विकत घेतल्या आहेत. नुकतेच भारताने रशियाकडून एस ४०० मिसाईल डिफेन्स सिस्टम विकत घेतले आहे. जे अद्याप प्राप्त झालेले नाही पण लवकरच येत्या काळात ते भारताला मिळण्यास सुरुवात होईल. या बदल्यात चीनकडे रशियानेच बनवलेले या प्रणालीचे आधीचे वर्जन एस ३०० आहे. चीन कडे असलेल्या एस ३०० प्रणालीची मारक क्षमता भारताकडे रशिया कडून येणाऱ्या प्रणालीच्या मारक क्षमतेपेक्षा कमी आहे.

चीनची पूर्ण सीमा बघितली तर २२,११७ एवढी आहे आणि भारताची सीमा १५,२०० एवढी आहे. त्यामुळे चीनला भारत व्यतिरिक्त इतर सीमेवर देखील सैन्य असणे गरजेचे आहे. भारताचे मुख्यतः दोन देशांशी सीमेवरून वाद आहे. एक पाकिस्तान आणि दुसरा चीन. सध्या नेपाळ सोबत सुद्धा वाद उत्पन्न झाले आहेत परंतु नेपाळपासून भारताला तितका धोका नाही. चीनच्या बाबतीत बोलायचे झाले तर चीनने अनेक देशांशी आपले संबंध खराब केलेले आहेत. त्यामुळे त्यांना एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष केंद्रित करावे लागत आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीमेवरती तणावपूर्ण वातावरण नक्कीच आहे परंतु हे युद्धामध्ये परावर्तित होईल असे नाही. विशेष म्हणजे परमाणु शस्त्रांचा वापर करणे कोणताही देश टाळणारच आहे. यातून कोणताही देश विजय झाला तरी त्या विजयी होण्यामागे खूप मोठे नुकसान सोबत राहणार आहे. सध्या चीन भारतावर केवळ दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु चीन भारतासोबत युद्ध करण्याच्या फंद्यात पडेल असे वाटत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा