चीनची नवी रणनिती- पाकिस्तान आणि श्रीलंकेला लोन देण्याबाबत ठेवले टांगून

चीन, २६ सप्टेंबर २०२२ : चीन हा देश कायम नवीन रणनिती आखण्यात पुढे आहे. कमजोर देशांवर कब्जा करण्याचं काम चीन करत आहे. सध्या श्रीलंका आणि पाकिस्तानची आर्थिक स्थिती खालावली आहे. हे जगभर माहित आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय निधी संघटनेकडून पाकिस्तानला आणि श्रीलंकेला चीनकडून आर्थिक मदत मिळणार होती. तसेच चीनने पाकिस्तानला काही काळापुरती लष्करी मदत देण्याचे कबूल केले होते.

तसेच दोन्ही देशांना सावरण्यासाठी लागणारी मदत देण्याचे कबूल केले होते. हा संपूर्ण करार केवळ विश्वासाच्या जोरावर होणार होता. पण मात्र सध्या चीनने दोन्ही देशांना केवळ पैसे देणार म्हणून लटकावून ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे धड ना इकडे, धड ना तिकडे अशी दोन्ही देशांची परिस्थिती झाली आहे.
या संदर्भात पाकिस्तानचे चीफ आर्मीचे जनरल कुमार जावेद बाजवा आणि चीनचे जनरल यांच्यात वाय फेंगे यांच्यात चर्चा झाली होती. पण त्यानंतर अजून कुठलाच निष्कर्ष निघाला नाही. आधीच्या चर्चेनुसार बिजींग अर्थात चीन पाकिस्तानला ५७ मिलीयन डॉलर्सची मदत करणार होता.

पण एकुणातच सध्या चीनने केवळ पाकिस्तान आणि श्रीलंकेला केवळ आश्वासन दिले आहे. पण ही मदत ते वास्तवात कधी देतील हे माहित नाही.
जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण तोपर्यंत दोन्ही देश अधांतरी राहणार की काय, हे पहावं लागेल..

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा