चीनचा चश्मा

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे मुंबईवरून स्वतंत्र बस करून आलेल्या लोकांना बस चालकाने शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीवर आणून सोडले, बस पहिली तेथे पोहोचली होती सर्व प्रवाशांना प्रशासनाने तिथेच थांबवून घेतले होते व दुपारी सीपीआर हॉस्पिटल ला तपासणीसाठी नेण्याचे कारण पुढे करून त्यांना परत मुंबईला पाठवण्यात आले. आलेले सर्व लोक सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून तीन जिल्ह्याच्या सीमा ओलांडून स्वतःच्या तालुक्यात प्रवेश करणार होते पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. बीड जिल्ह्यातील पायी चालणार्‍या एका मजुराचा अन्नपाण्याविना मृत्यू झाला तर मुंबईवरून जुन्नर ह्या आपल्या गावी जाणाऱ्या दोघांचा चेक नाक्यावर पोलिसांची नजर चुकवून आणणार्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर डोंबिवलीहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या पाटील दाम्पत्याचा मोटरसायकलला अपघात होऊन पती पत्नी व दोन लहान मुलांचं विनाकारण येथे मृत्यू झाला. लोकडाऊन होण्याच्या भीतीने मिळेल त्या वाहनाने किंवा पायी गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

वेळप्रसंगी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत, पण गावात आल्यानंतर त्याच लोकांना गावातील लोक व आप्तस्वकीय यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. लोक सुट्टीत गावी यायचे त्या वेळी हिंदी फिल्म च्या गाण्यातील ओळीप्रमाणे ” मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो” पण आज मुंबई पुण्या वरून आला तर त्याला गावच्या हद्दीत घेण्या पासूनच विरोध करण्यास सुरुवात करतात. ते स्वतःच्या गावचे नाव अभिमानाने पुण्या-मुंबईत सांगतात त्यात स्वतःच्या गावाच्या वेशीवरच रोखले जात आहे किंवा परत पाठविल्या जात आहे, व जरी प्रवेश दिला तर शाळेत ठेवून त्यांना बाहेरून जेवण पाणी पुरवले जात आहे.

मुंबई पुणे सोडून जसे परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात परतत आहेत तसेच आपलेही लोक आपल्या मूळ गावी जात आहेत, कारण मुंबई-पुण्यात हाताला काम नाही त्यातच सुप्रीम कोर्टाने कामगारांना वेतन देणे बंधनकारक असतानाही याचा निर्वाळा दिला आहे ,ही सर्वात मोठी अडचण आहे ती भाड्याने राहणाऱ्या कुटुंबांची, कारण जरी सरकारने सांगितले असले की भाडे मागू नका तरी किती मालक समंजसपणे थांबले असते हा संशोधनाचा विषय आहे.

शहरांमध्ये घराचे भाडे ही मोठ्या प्रमाणावर आकारले जाते या सर्व गोष्टींना तोंड द्यावे की कोरणा पासून कसे वाचावे ही चिंता आहे, या सर्व गोष्टींचा लेखाजोखा यावेळी कामगार करतात त्यावेळी गावी जाण्यास शिवाय कोणताही पर्याय दिसत नाही. जरी शहरात राहिले तरी किती दिवस दहा बाय दहाच्या रूम मध्ये कुटुंब बंदिस्त करून ठेवणार त्यातच लहान मुलांच्या उन्हामुळे मोठे हाल होत आहेत बाहेर पडता येत नाही असल्या मुळे व पुढेही लवकरात लवकर काही चालू होईल अशी आशा नाही नाही त्यामुळेच कुटुंबांच्या व स्वतःच्या रोजीरोटीचा प्रश्न कसा सोडवणार सरकार प्रशासन या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे यात शंकाच नाही, पण आभाळ फाटल्यावर ठिगळ लावणार कुठे? स्वतःच्या गावात येणाऱ्या आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांची सिम बंद करून टाकली आहे. स्वतःच्या गावात घेण्यास नकार देत आहेत त्या वेळी होणाऱ्या वेदना काय असलेल्या त्यांनाच माहीत कारण त्यावेळी गावात कोणाचेही काम पुण्या-मुंबईत असले या लोकांच्या घरी उतरून याच लोकांच्या ओळखीने कामे करून आपल्या गावी परतायचे मंदिराची वर्गणी असो की यात्रेची वर्गणी पहिल्यांदा पुणे व मुंबई येथील लोकांना न विचारताच हे गावातील लोक पावती फाडायचे व आज त्यांना स्वतःच्या गावात यायला बंदी आहे, मोठे हे दुर्दैव.

आज-काल सर्वांच्या कडे मोबाईल आहेत त्यामध्ये जाहिरात करण्यात येत आहे की “आपल्याला लढायचे आहे रोगाशी रोग्यांशी नाही” पण ऐकणार कोण कारण आज सर्वांच्याच डोक्यावर हा चष्मा चीनने फुकटात दिला आहे ना..

अशोक कांबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा