नवी दिल्ली, दि. २५ जून २०२०: भारत आणि चीनमधील तणाव वाढतच आहे. गलवान खोऱ्यामध्ये हिंसक झटापटी नंतर पूर्ण भारतात चीन विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये चिनी नागरिकांना हॉटेल्समध्ये तसेच अतिथिगृहा मध्ये राहता येणार नाही. दिल्लीतील सर्व हॉटेल्स मध्ये चिनी नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत
दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशनने (धुर्वा) चीनच्या वस्तूंच्या अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या (कॅट) बहिष्काराच्या आवाहनावर मोठा निर्णय घेतला आहे. संघटनेने घोषित केले आहे की चीनच्या आक्रमकतेचा विचार करता, आतापासून दिल्लीच्या हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये कोणत्याही चिनी नागरिकांचे आयोजन केले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये जवळपास ३००० बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊस आहेत. ज्यामध्ये जवळपास ७५ हजार खोल्या आहेत. ही माहिती देताना दिल्ली हॉटेल व गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशनचे सरचिटणीस महेंद्र गुप्ता म्हणाले की, चीन ज्या पद्धतीने भारताशी वागत आहे आणि ज्या प्रकारे हिंसक संघर्षात भारतीय सैनिक शहीद झाले, त्या कारणामुळे दिल्लीतील सर्व हॉटेल चालकांच्या मनामध्ये चीनविषयी आक्रोश आहे.
ते म्हणाले की, जेव्हा कॅट ने देशभरातील चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी मोहीम राबविली आहे, तेव्हा दिल्लीतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचे व्यापारीदेखील यात सहभागी होतील आणि त्या दृष्टीने आम्ही आतापासूनच दिल्लीत हा निर्णय घेतला आहे की कोणत्याही बजेट हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये चिनी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.
कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी या निर्णयाचे स्वागत करत असे सांगितले की, देशातील विविध विभागातील लोक कॅटद्वारे सुरू केलेल्या चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याच्या आवाहनात सामील होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते म्हणाले की, या संदर्भात कॅट आता वाहतूक, शेतकरी, फेरीवाले, लघु उद्योग, ग्राहक उद्योजक स्वत: , महिला उद्योजकांच्या राष्ट्रीय संघटनांशी संपर्क साधेल आणि त्यांना या मोहिमेशी जोडेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी