चिनी सैन्य म्यानमार सीमेवर दाखल, काय आहे कारण?

म्यानमार, ५ एप्रिल २०२१: सध्या म्यानमारमध्ये लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकार पाडल्यानंतर लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याविरोधात म्यानमार लष्करा विरोधात देशातील नागरिक निदर्शने करीत आहेत. मात्र, यादरम्यान आता चिनी सैन्य देखील म्यानमारच्या आसपास तैनात झाले आहे. याचे कारण असे आहे की, चीनला कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या पाईपलाईन म्यानमार मधून येतात. म्यानमार मधील नागरिक आपला आक्रोश व्यक्त करताना या पाईपलाईन नष्ट करतील या भीतीने चिनी सैन्य येथे दाखल झाले आहे.
चीन आणि म्यानमार या दोन्ही देशांमध्ये २ हजार किलोमीटर पेक्षा जास्त सीमा सामायिक आहे. या सीमेलगत चिनी सैन्य दाखल झाले आहे. असे देखील सांगितले जात आहे की, जर म्यानमारमध्ये लष्करी विरोधात गृह युद्ध सुरू झाले तर चीन म्यानमारमधील अशा भागावर ताबा मिळू शकतो जो भाग चीन साठी आर्थिक दृष्ट्या महत्वाचा आहे.
२००८ पासून चीनने म्यानमारमध्ये कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी मोठ्या पाईपलाईन बनविण्यास सुरुवात केली होती. या पाईपलाईन बनवण्यासाठी चीनने स्वतः खर्च केला होता. म्यानमार मधील क्यापूपोर पासून ही पाईपलाईन सुरू होऊन चीनमधील कुनामिंग भागापर्यंत जाते. त्या पाईप लाईन मधून चीनला १२ मिलियन टन कच्चे तेल मिळते तर १२ बिल्लियन टन नैसर्गिक वायू देखील प्राप्त होतो. हा कच्च्या तेलाचा पुरवठा इराण, सौदी अरेबिया आणि कतर यांसारख्या देशांमधून म्यानमार मार्गे चीन मध्ये पोहोचतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा