लडाख,१८ जून २०२० : भारत आणि चीनचे गलवानमधे तणावाचे वातावरण आहे.तर ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेेने चकमकीवेळी भारतीय लष्कराकडे शस्त्र नव्हती तर चीनच्या लष्कराकडे शस्त्र होती असे वृत्त दिले आहे.ज्यामुळे चीनी लष्कराने अत्यंत नियोजनपुर्वक सापळा रचून १२० भारतीय जवानांना घेरले होते.
सुरूवातीला आलेल्या माहितीनुसार दगड,राॅड आणि हातापायांनी चकमक झाली अशा बातम्या आल्या , पण या चकमकीवेळी चीन लष्करानी भारतीय जवानांच्या कपाळावर बंदूक ठेवून हिंसक अत्याचार केले. हि मारामारी दगडांनी हातापायांनी राॅडने झाली नसून चीन सैनिकांनी संपूर्ण शस्त्रासह केल्याचे वृतसंस्थेने सांगितले आहे .भारतीय लष्करांना शस्त्र वापरण्याची परवानगी नसल्याने त्यांनी निशस्त्र परिस्थितीचा सामना केला. तर परिस्थिती नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला.
या धुमश्क्रीत भारताच्या २० सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. ज्या मुळे भारतीय नगरिकांमध्ये देखील अक्रोश पाहायला मिळतोय चीनच्या विविध वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली जात आहे. तर चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचा पुतळा देखील जाळण्यात आला व तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी