चित्रपट विभाग जागतिक पर्यावरण दिनी करणार माहितीपटांचे ऑनलाईन प्रसारण

नवी दिल्ली, दि. ५ जून २०२०: लिव्हिंग द नॅचरल वे’ आणि ‘वॅनिशिंग ग्लेशिअर’ ऑनलाइन दाखविले जातील; चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब चॅनेलवर पाहण्यासाठी आज ५ जून २०२० रोजी विनामूल्य उपलब्ध असतील.

माध्यम म्हणून चित्रपट, व्यापक कक्षेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो आणि सामान्य लोकांमध्ये किंवा दर्शकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. देशभरात सगळीकडे साथीच्या आजाराशी लढा सुरू असताना सिनेमागृह आणि चित्रपटगृह बंद असले, तरीही नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट विभाग अर्थात फिल्म्स डिव्हीजन, माहितीपटांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.

‘लिव्हिंग द नॅचरल वे’ (७८ मि./ संजीव पराशर), ब्रह्मपुत्रातील एका छोट्या बेटावर राहणाऱ्या मिशिंग जमातीची, तसेच तेथील बदलते हवामान व पर्यावरण आणि त्यांच्या पारंपरिक राहणीमानाला दिल्या गेलेल्या आव्हानाची एक कथा आहे.

‘व्हॅनिशिंग ग्लेशिअर’ (५२ मि. / राजा शबीर खान) माहितीपट, जागतिक तापमानवाढीमुळे आणि हिवाळ्यातील वातावरणावरील परिणामामुळे असामान्यपणे वितळणाऱ्या हिमनगाबाबतची चिंता मांडतो.

कसे/आणि कुठे पाहता येईल ?

हे चित्रपट ऑनलाइन पाहण्यासाठी www.filmsdivision.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी. ‘डॉक्युमेंट्री ऑफ द विक’ या विभागात हे चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. फिल्म्स डिव्हिजनच्या यू ट्यूब चॅनेलवर देखील तुम्ही हे चित्रपट पाहू शकता. जागतिक स्तरावर जनजागृतीसाठी आणि पर्यावरण संरक्षणाबाबतची कृती करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आणि चित्रपट विभाग देखील याकामी निर्मिती करून आपले योगदान देत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा