चोपडा काँग्रेस पक्ष, आदिवासी सेवा मंडळ चोपडा आणि शरद्चंद्रिका आक्का नागरी पतसंस्था चोपडा यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत करण्यात आली. हा धनादेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला.
यंदाच्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे शेती, पशुधन आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घासही हिरावून घेतला गेला आहे. अशा कठीण काळात राजकारण विसरून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत या संस्थांनी शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमांतर्गत शरद्चंद्रिका आक्का नागरी पतसंस्था चोपडा यांच्या वतीने ₹२५,०००, आदिवासी सेवा मंडळ चोपडा यांच्या वतीने ₹२५,००० आणि चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने ₹११,००० असा एकूण ₹६१,००० चा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला. हा उपक्रम समाजातील संवेदनशीलता आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करणारा ठरला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अँड. संदीप सुरेश पाटील यांच्यासह माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, शिवाजी अभिमन देसले, गोपाल नवल धनगर, बाळकृष्ण शंकरराव सोनवणे, शरद धनगर, देविदास धनगर, सुनील बागुले, वजाहत काझी, प्रमोद पाटील, देवानंद शिंदे, शशिकांत साळुंखे, जहीरभाई शेख, आरिफ सिद्दिकी, छन्नु नाना पाटील, विकास जनकराव पाटील, मोहन देवराम पाटील, अशोक लिलाचंद पाटील, किशोर पाटील, नंदलाल शिंदे, प्रवीण पाटील, मासूम दादा तडवी, महारु सरदार तडवी, गुलाब दादा बारेला, अशोक नारायण पाटील, दिपक दादा चौधरी, अविनाश पाटील आणि इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून चोपडा काँग्रेस, आदिवासी सेवा मंडळ आणि शरद्चंद्रिका आक्का पतसंस्थेने दिलेला हा मदतीचा हात समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी आत्माराम पाटील












































