भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे प्रभारी अरीज बेग मिर्झा यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असा सल्ला दिला. ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत कुणाशी युती करावी किंवा न करावी याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा.
चोपडा तालुका काँग्रेसच्या वतीने दिनांक २५ रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकी संदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार शिरीष चौधरी, चोपडा काँग्रेसचे प्रभारी संजय उमरकर, सुबोध गिरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सुरेश पाटील, अजबराव पाटील, के. डी. चौधरी आदी उपस्थित होते.
चोपडा तालुका काँग्रेस निरीक्षक संजय उमरकर म्हणाले की, येणाऱ्या काळात लढाई मतांची नसून विश्वासाची आहे. पक्षासाठी योगदान द्यावे लागेल, त्यासाठी ओंजळी भरून काम करावे. काही नेते काँग्रेस संपवायला निघाले होते, आता त्यांचे परिणाम आपण पाहत आहोत. याबाबत निर्णय स्थानिक पातळीवर घेणे महत्त्वाचे आहे. नगरपालिकेतील प्रत्येक प्रभागासाठी बैठक घेतली जाईल.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. संदीप पाटील म्हणाले की, काँग्रेसमध्ये विश्वासू कार्यकर्ते आहेत. तालुका पातळीवरील तयारी गेल्या महिन्यापासून सुरु आहे. पक्ष मोठा असल्यामुळे तयारी जोरात सुरू आहे. मतदारांमध्ये संभ्रम आहे, तरीही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत माजी आमदार शिरीष चौधरी, पंचायत समिती माजी सभापती प्रमोद पाटील, अशोक साळुंखे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे, चोसाका उपाध्यक्ष शिवाजी देसले, संचालक गोपाळ धनगर, माजी नगरसेविका फातिमाताई पठाण, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, राजेंद्र पाटील, मधुकर बाविस्कर, वजाहत काझी, डॉ. बी. आर. पाटील, शांताराम लोहार, यशवंत खैरनार, लक्ष्मण काविरे, देविदास साळुंखे, संजय शिंदे, अरिफ सिद्दिकी, पृथ्वीराज सैंदाणे, गोपाल धनगर, विकास पाटील, प्रताप सोनवणे, जुनेद खान पठाण, विजय पाटील, दारासिंग बारीला, मोमीन रमजान, ज्ञानसिंग पावरा, शर्मा पावरा, रामदास पावरा, मुकेश पावरा, श्रीराम गायकवाड, विशाल भाडले, समाधान पावरा, किशोर पाटील, प्रवीण पाटील, शेख आरिफ सय्यद, अहमद शेख फरदीन, अरिफ मन्यार, मन्यार खान, अब्दुल शेख, शाहीर अली, जहीर शेख, अरिफ सिद्दिकी, अनिल पाटील, मोहन पाटील, चंदू पाटील, जितेंद्र पाटील, शैलेश कुमार वाघ, मयूर पाटील, देवानंद पाटील, संजय पाटील, राहुल साळुंखे, गोविंदा महाजन, अशोक साळुंखे, राजेश राठोड, अविनाश पाटील, माणिक पाटील, प्रमोद पाटील, भानुदास पाटील, दिलीप पाटील यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी आत्माराम पाटील













































