आंबेगाव: मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंपळगाव तालुका आंबेगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पिंपळगाव उपकेंद्रातील काठापुर, कवठे येमाई ,या गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या अर्थिंग ब्लेड असणारे तांब्याचे रॉड चोरट्यांनी चोरून नेले असल्याची घटना घडली असून हे चोरताना एक चोरटा शॉक लागुन गंभीररीत्या भाजून जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की पिंपळगाव तालुका आंबेगाव येथील महावितरणच्या उपकेंद्रात बुधवार दिनांक १५ रोजी दोन चोरट्यांनी महावितरणच्या उपकेंद्रात प्रवेश करून काठापुर व कवठे येमाई या गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या आर्थिग चे ब्लेड असणारे सुमारे ७४,५०० रुपये किमतीचे तांब्याचे रॉड चोरून नेले आहेत या बाबत पिंपळगाव केंद्रात काम करणारा कर्मचारी अक्षय वामन यांना चोरी झाल्याचे कळताच त्यांनी वरिष्ठ अधिकारी देवेंद्र पाटील यांना याबाबत माहिती दिली यावेळी त्यांनी घटनास्थळी येत पाहिले असता ही चोरी करताना पवन बबूशा कडाळे ( सध्या राहणार पिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे )हा चोरटा शॉक लागून भाजलेल्या स्थितीत तेथे पडलेला आढळून आला त्याचा साथीदार ऐवज घेऊन पळून गेला आहे.
जखमी चोरट्या वर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून या चोरट्या विरोधात पिंपळगाव येथील उपकेंद्रात कार्यरत असलेले देवेंद्र राजेंद्र पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सागर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.