मुंबई, १ ऑक्टोंबर २०२०: केंद्र सरकारकडून काल जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक ५ साठीच्या निर्देशांकामध्ये सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. या निर्देशानुसार १५ ऑक्टोबर पासून देशातील सर्व सिनेमागृह सुरू करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिलीय. असं असलं तरी राज्य सरकारनं मात्र राज्यात सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी नाकारलीय. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील सर्व सिनेमागृहे ५० टक्के क्षमतं सहज सुरू करण्यात येतील म्हणजेच सिनेमागृह मधील आसनांच्या क्षमतेच्या निम्म्या संख्यानं असणं वापरण्यात येतील. जेणे करून सोशल डिस्टंसिंग पाळलं जाईल.
केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार सिनेमा/थियेटर/मल्टीप्लेक्स यांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के आसन व्यवस्थेनुसार सुरु करण्याची परवानगी देण्यात आलीय. याविषयीचे प्रमाणित कार्यान्वयन प्रोटोकॉल SOP माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून जारी केले जातील. कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही सिनेमागृहे बंदच असून त्यासाठी भविष्यात सूचना दिल्या जातील. असं सांगण्यात आलंय.
राज्य सरकारनं अनलॉक चार मध्ये देखील सिनेमागृहांना परवानगी दिली नव्हती. त्यासह काल जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक पाच मध्ये देखील राज्य सरकारनं सिनेमागृहांना परवानगी नाकारलीय. यावेळी सिनेमागृहात सुरू होतील अशी सर्वांना आशा लागली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे