डोंबिवलीत जास्तीच्या वीज बिलाविरोधात नागरिकांचा महावितरणाला घेराव

कल्याण, दि. २२ जुलै २०२०: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने वीज बिले भरण्यास शिथीलता दिली होती. मात्र अचानक नंतर बील वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मात्र तक्रार करून सूद्धा बिलाच्या रकमेत काहीच बदल न झाल्याने नागरिकांना आहे ती रक्कम मोजणे बंधनकारक ठरले आहे. ती रक्कम भरण्यासाठी सुद्धा तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने संतापलेल्या ग्राहकांनी महावितरणच्या उप अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला.

बीलमध्ये वाढ झाल्याने जास्त रकमेचे बिल कशामुळे आले हे हे समजून घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात रांगेत उभे राहावे लागत आहे. तेथील कामकाज देखील संथगतीने असल्याचे बिलधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेरीस त्रस्त ग्राहकांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी उपअभियंत्यांच्या दालनात धाव घेतली व त्यांना घेराव घातला.

उपअभियंत्यांनी ग्राहकांच्या तक्रारींना उत्तर दिल्यावरच ग्राहक शांत झाले. ग्राहकांना वीज बिले जास्त का आली, याची माहिती एका खिडकी योजनेद्वारे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून देण्यात आली .नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र त्याच्या शंकेचे निरसन केल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली असे महावितरण उपअभियंता नितीन ढोकणे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनीधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा