पुणे, ७ मे २०२१: पुणे शहरामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव होऊ नये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शहरातील नागरिकांना (हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षापुढील ४५ वर्षे ते ५९ वर्षापर्यंत व १८ ते ४४ वयोगटापर्यंत) कोव्हॅक्सिन / कोव्हीशिल्ड ही लस पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दिनांक १ में २०२१ पासून पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनाच्या सुचनेनुसार १८ ते ४४ वयोगटातील लाभाथ्र्यांना कोव्हीड लसीकरण देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेतर्फ कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ, राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे कोव्हीशिल्ड व आण्णासाहेब मगर रुग्णालय हडपसर, के. जयाबाई सुतार दवाखाना कोथरुड, मुरलीधर लायगुडे हॉस्पिटल, धायरी, ससून हॉस्पिटल, स्टेशन रोड या रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येणार आहे.
सदर वयोगटातील नागरीकांनी कोव्हीन अॅप / आरोग्य सेतु अॅप या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. नाव नोंदणी झाल्यानंतर नमुद केलेल्या केंद्रावरच संबंधिताना लस देण्यात येईल. सदर लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नोंदणी न करता थेट जावू नये, नाव नोंदणी न केलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार नसल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.
लसीकरण केंद्रांची नावे
१. कमला नेहरू हॉस्पिटल, मंगळवार पेठ (कोव्हीशिल्ड, डोस ची संख्या ३५०)
२. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा (कोव्हीशिल्ड, डोस ची संख्या ३५०
३. आण्णासाहेब मगर हॉस्पिटल, हडपसर (कोव्हॅक्सिन, डोस ची संख्या ५००)
४. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरुड ( कोव्हॅक्सिन, डोस ची संख्या ५००)
५. मुरलीधर लायगुडे हॉस्पिटल, धायरी ( कोव्हॅक्सिन, डोस ची संख्या ५००)
६. ससून हॉस्पिटल (कोव्हॅक्सिन, डोस ची संख्या २००)
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे