भोकरदन, जालना १६ फेब्रुवारी २०२४ : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील पाणीपुरवठा खडकपूर्णा धरणातुन सुरळीत करुन, शहराला नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भोकरदन शहराला नगर परीषद भोकरदन यांच्या हलगर्जीपणामुळे शहरात पंचविस ते तिस दिवसाआड पाणी येत असुन भोकरदन शहरातील जनता पाण्या अभावी त्रस्त झाली आहे. यापूर्वी देखील शहरातील नागरीकांनी पाणीपुरवठा व विविध समस्याविषयी नगर परीषदेला वारंवार निवेदन दिले आहे.
नगर परीषदेने नागरीकांच्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनाची दखल घेतली नाही. जर शासनाने खडक पुर्णा धरणामधुन पाईपलाईनव्दारे शहराला पाणी साठा उपलब्ध करुण दिल्यास भोकरदन शहरातील नागरीकांची पाण्याची समस्या कायमची दुर होऊ शकते. नगर परीषदेने पाच दिवसात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास नगर परिषद कार्यालय समोर लोकशाही मार्गाने शहरातील नागरीकांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल. निवेदनाची गंभीर दखल न घेतल्यास व आंदोलना दरम्यान काही अनुचीत प्रकार घडल्यास त्यास नगर परीषद मुख्याधिकारी हे जबाबदार राहतील असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.
निवेदनावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने, माजी नगरसेवक सुरेश शर्मा,सतिष रोकडे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,गंगाधर कांबळे, डॉ. संजय देशपांडे, दिपक तळेकर, सुरेश अप्पासाहेब बनकर, दिपक मोरे, शीतल प्रदिप जोगदंडे, शेख नजीर, माजी नगरसेवक रणवीरसिंह देशमुख, आशाताई माळी, राहुल ठाकुर, नारायण तळेकर, ज्ञानेश्वर तळेकर, रमेश बिरसोने, शेख तौसिफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे