नागरिकांनी आपली काळजी घ्यावी: प्रविण माने

इंदापूर, दि. २५ जून २०२० : राज्यातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने गुरुवारी प्रविणभैय्या माने युवामंच व शिवशंभू चॅरिटेबलच्या ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित केलेले रक्तदान शिबिर इंदापूर तालुक्यातील जांब येथे संपन्न झाले. पुणे जिल्हा परिषद सदस्य व माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती मा. प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जांब येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन प्रविण माने यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास २० लिटर पाण्याचे जार, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगावर उद्भवलेल्या या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपण शक्य त्या साऱ्याच गोष्टी करत असून, राज्याच्या रक्तपेढीची तूट भरून काढणे, नागरिकांना सॅनिटायझर व मास्क वाटप हेच त्यातील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे माने यांनी यावेळी सांगितले, तसेच येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणवर होत असतो अशावेळी नागरिकांनी आपली योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे असल्याचे यावेळी माने यांनी सांगतिले.

आज जांब येथे संपन्न झालेल्या रक्तदान कार्यक्रमाप्रसंगी धनाजी रूपनवर, तानाजी रूपनवर, सुरेश पाटील, बाळासाहेब रूपनवर, सर्जेराव पाटील, अनील पांढरे, अमरसिंह मारकड पाटील, योगेश डोंबाळे पाटील, अमर रूपनवर, संदीप पाटील, आदित्य रूपनवर, समर रूपनवर,अजीत रूपनवर, नीतीन पाटिल आणि जांब गावचे ग्रामस्थ व इतर सहकारी मान्यवरही उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा