नागपूर, ११ फेब्रुवारी २०२४ : केंद्र सरकारने निवडणूक पूर्वी जे अंतरिम बजेट सादर केले ते पुन्हा एकदा कामगार -शेतकरी – सर्व सामान्य जनतेवर बोझा लादणारे आणि कार्पोरेट क्षेत्राला करांमध्ये सुट देणारे असून महागाई व बेरोजगारी वाढविणारे बजेट आहे असा आरोप सिटू काढून करण्यात आलाय. सिटूच्या आवाहनानुसार अंगणवाडी कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र व सिटू जिल्हा कमिटीच्या तर्फे संविधान चौकात तीव्र निदर्शने करून बजेटची होळी करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना किसान सभेचे नेते व माकपाचे नागपूर जिल्हा सचिव कॉ.अरुण लाटकर यांनी केंन्द्राच्या बजेट बाबत विस्तृत मांडणी केली. त्यांनी सांगीतले की, केंन्द्र सरकारने मनरेगा, एकात्मिक महिला व बाल विकास योजना, आशा व इतर योजना हयावरील खर्चात जबरदस्त कपात केली आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या योजनेवरील जो खर्च २१,५०० करोड होता. तो ३०० करोड रुपयांनी कमी केला आहे. तसेच मनरेगा योजनेवरील खर्चही कमी केला आहे. या बजेट मध्ये केंन्द्र सरकारने खतांवरील देण्यात येणारी सबसिडीत पण कपात करुन शेतक-यांवर हल्लाच केला आहे. आधीच शेतकरी हे संकटात आहेत व पुन्हा या बजेटमध्ये संकटातच टाकले आहे.
कॉ.अरुण लाटकरांनी या निदर्शनात हजर असलेल्या शेकडो अंगणवाडी सेविकांना १६ फेब्रुवारीचा कामगारांचा औद्योगिक बंद व संयुक्त किसान मोर्चा तर्फे पुकारण्यात आलेला ग्रामीण बंदचा प्रचार करुन मोदीच्या नेतृत्वातील भाजपाला पराभूत करण्याचा संदेश देण्याचे आवाहन केले. या निदर्शनास सिटू चे कॉ.दिलीप देशपांडे, महासचिव, अंगणवाडीच्या नेत्या कॉ.चंदा मेंढे, कॉ.शशी काळे, अध्यक्ष, नागपूर जनरल लेबर युनियन व जेसिटीयुएचे कॉ.गुरुप्रितसंह, एमएसएमआरएचे कों चंद्रशेखर मालविय, हयांनी संबोधित केले. निदर्शनाचे नेतृत्व कॉ. रामेश्वर चरपे, चंदा मारिया, माधुरी जामगडे, मिना पाटील, मिनाक्षी फुलझेले, प्रिति पराते, लता साठवणे, चंदा काशि, कोमल, पुर्णिमा सहारे, सविता नारनवरे, नंदेश्वर आदीनी केले व शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस हयांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनावणे