युवकाला लुटणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी केली अटक

बारामती, ७ ऑक्टोबर २०२० : शहरातील प्रगती नगर रेल्वे उड्डाण पुलानजीक सातव चौकाजवळ दुचाकीस्वाराकडील दोन मोबाईल दमदाटी करत धारदार शास्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटणाऱ्या दोघांना बारामती शहर पोलिसांनी आज अटक केली आहे .रोहन ऊर्फ कल्या अविराज माने (वय १९ रा. तांदूळवाडी, बारामती ) व किरण राजेंद्र चव्हाण (वय २१, रा. वीरशैव मंगल कार्यालयजवळ, बारामती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत विक्की विठ्ठल माळवे (मूळ रा. पळशी, म्हसवड, ता. माण, जि. सातारा, सध्या- चौधरवस्ती, बारामती) या युवकाने फिर्याद दिली होती. दि.१ आॅक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास माळवे हा मित्रांसोबत जेवण करून घरी परतत असताना दोघा अनोळखी युवकांनी त्याला पत्ता विचारण्याचा बहाणा करत थांबवले.माळवे याला शास्त्राचा धाक दाखवून त्याच्या शर्टाच्या खिशातील दोन मोबाइल बळजबरीने काढून घेतले व त्याला मारहाण केली.टी.सातव चौकातील उड्डाण पुलाच्या जवळ ही घटना घडली होती.

या बाबत विक्की माळवे यांनी बारामती शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा