CKP बँक खातेदारांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्यास सुरवात

नवी दिल्ली ६ जुलै २०२० : भारतातील आर्थिक परिस्थिती गेल्या काही वर्षापासून डळमळीत चालू आसून RBI ने अनेक बँकांवर धाड टाकायला सुरवात केली होती त्यातीलच एक म्हणजे CKP बँक.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ३० एप्रिल २०२० रोजी CKP बँकेचा परवाना रद्द केला होता. त्या मुळे बँकेतील खातेदारांना मोठा धक्का बसला होता. परंतु आता खातेदारांना त्यांच्या अकाउंट मधील ठेवी विमा महामंडळकडून त्यांच्या एफडी रिफंड मिळणार आसून त्यांच्या मधे समाधानाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स महासंघाने पुढीलप्रमाणे माहिती दिली.महामंडळाच्या ह्या नव्या सुधारित नियमाचा फायदा बँक खातेदारांना होताना दिसत आहे. ह्या सुधारित नियमा अंतर्गत फडी व्याज किंवा ५ लाख रुपये या पैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम खातेदारांना देण्यात येईल.

खातेदारांना आपल्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी ठेवी कॉर्पोरेशनच्या नियमांच्या तरतुदी नुसार त्यांच्या ठेवीच्या रकमेचा दावा करू शकतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. त्यांना पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता बँकेच्या विहित नमुन्यात सबमिट करावे लागणार आहेत.

काही खातेदारांना पोस्टाने पाठवलेल्या एका माहिती सांगितले गेले आहे. ज्या खातेदारांना हा फॉर्म मिळाला नाही त्यांनी जवळच्या बँक शाखेत जाऊन घेऊ शकतात. याशिवाय हा फॉर्म त्यांना बँकेच्या www.ckpbank.net या सांकेतिक स्थळांवर उपलब्ध आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा