छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमक

7

छत्तीसगड, २१ एप्रिल २०२३: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि जवान यांच्यात आज पुन्हा एकदा चकमक झाली आहे. नक्षलवादी आणि जिल्हा राखीव गटाचे (DRG) जवान यांच्यात झालेल्या चकमकीत चार ते पाच नक्षलवादी जखमी झाले आहेत. अशी माहिती छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्याचे एसपी सुनील शर्मा यांनी दिली आहे.

एसपी सुनील शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा कहर केला आहे. येथे झालेल्या चकमकीत सुमारे चार ते पाच नक्षलवादी जखमी झाले असून, सुरक्षा जवान सुरक्षित आहेत. या चकमकीनंतर परिसरात सुरक्षा जवानांनी शोध मोहीम सुरू आहे. असे देखील पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान संपूर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा