जम्मू काश्मीर, ५ मे २०२३: जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये आज सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. राजौरीमधील कंडी या भागात सकाळी साडेसातच्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या चकमकी दरम्यान भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. लष्कराच्या एका अधिकाऱ्यांसह चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहिती नुसार, या भागात दहशतवाधांचा आणखी एक गट लपून बसला असून, पुन्हा आणखी एकदा लष्कर आणि दहशतवादी गटांमध्ये चकमकीची शक्यता आहे. सर्च ऑपरेशन सुरू असून, या संदर्भात पुढील तपशील तपासाला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. असे देखील लष्करांने सांगितले आहे.
चकमकी दरम्यान दहशतवाद्यांनी स्फोटकांचा वापर केल्याने यामध्ये दोन जवान शहीद झाले. तर एका अधिकाऱ्यांसह चार जवान जखमी झालेत. जवळपासच्या भागातून अतिरिक्त पथके चकमकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. प्राथमिक माहिती नुसार, दहशतवाद्यांच्या एका गटाने परिसरात घेरले आहे. अजूनही काही ठिकाणी चकमक सुरूच आहे. अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर