जम्मू-काश्मीर, ४ सप्टेंबर २०२०: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी सुरू आहे. चकमकीदरम्यान सैन्यातील मेजर जखमी झाले आहेत. त्यांना ९२ बेस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. येदिपोरा येथील पट्टन मध्ये सुरक्षा दलाला दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे, तर आणखी दोन दहशतवादी अजूनही या भागात लपून गोळीबार करीत आहेत. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी भारतीय सुरक्षा दलाला बारामुल्लाच्या येदिपोरा पट्टन भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. विरोधी गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांची सुरक्षा दलांबरोबर चकमक सुरू आहे.
भारतीय सुरक्षा दलाला बारामुल्लाच्या पाटणच्या येडीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच भारतीय सुरक्षा दलांनी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या भागाला घेराव घालण्यास सुरवात केली. परिसरात शोध मोहीम सुरू होताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रथम दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. परंतु, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. यानंतर सुरक्षा दलांनाही गोळीबार करावा लागला.
पाच दिवसांपूर्वीच सीआरपीएफच्या नाका पक्षावर जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लाच्या केरी भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन दहशतवादी ठार झाले तर पाच सैनिक शहीद झाले. ठार झालेल्या सर्व दहशतवाद्यांचा संबंध लश्कर ए तैयबाशी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज झालेल्या चकमकीत दहशतवादी कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत हे अद्याप कळू शकले नाही.
दक्षिण काश्मीरच्या शोपियान येथे संशयास्पद कारवायांच्या माहितीवरून सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. शोपियांच्या लगरण भागात ही मोहीम राबविली जात आहे. सैन्य-४४-आरआर (राष्ट्रीय रायफल्स) आणि एसओजी यांची संयुक्त टीम हे शोध अभियान राबवित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे