वानवडी प्रभागातील एनसीपी हेल्पलाइनचा समारोप समारंभ पार

पुणे १४ ऑक्टोबर २०२० :पुण्यातील वानवडी प्रभागातील नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या मतदारसंघातील एन सी पी हेल्पलाइनचा समारोप आज करण्यात आला. जगताप चौक येथील एनसीपी हेल्पलाईनचा समारोप आमदार तथा पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय श्री चेतन तुपे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

पुणे शहरात कोविड १९ या संसर्गजन्य रोगाने मार्च महिन्यात प्रवेश केल्यापासून जगताप चौक येथील नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयातून बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना बाधा होऊ शकतील अशा सर्व नागरिकांना वेळोवेळी स्वॅब टेस्ट, ऍम्ब्युलन्स ,हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन मिळवून देणे, हॉस्पिटलचे बिल कमी करून देणे ,सेंटरमध्ये मोफत सर्व ट्रीटमेंट करून घेणे ही कामे वेळोवेळी करण्यात आली.

या दरम्यान शरद पवार यांच्या आदेशानुसार एनसीपी कोविड १९ हेल्पलाईन मागील ३० दिवसांपासून शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात चालू करण्यात आल्या होत्या. ३० दिवसांमध्ये हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक कोविड बाधित रुग्णांना पवार साहेब यांनी उपलब्ध करून दिलेली अत्यंत आवश्यक अशी रेमडीसीवर इंजेक्शन मोफत देण्यात आली, यामुळे खूप सार्‍या रुग्णांचे प्राण वाचवण्यास हेल्पलाइन उपयोगी पडली. आज या प्रत्येक मतदारसंघात हेल्पलाईनचा समारोप करण्यात आलेला आहे .

‘ही हेल्पलाइन आज बंद जरी झाली असली तरी माझ्या जनसंपर्क कार्यालयातून कोविड १९ संदर्भात सर्व प्रकारची मदत आणि माहिती पुणे शहर कमळ मुक्त होई पर्यंत मिळेल आज हा शब्द मी आपणास देतो’ ,असे वचन यावेळी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी नागरिकांना दिले.

याप्रसंगी सकाळ समूहाचे श्री. सुनीलजी माळी सर , नगरसेविका सौ. रत्नप्रभाताई जगताप, व्यापारी सेलचे अध्यक्ष श्री. भोलासिंगजी आरोरा, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. आनंदजी सवाणे, कार्याध्यक्ष फहीमभाई शेख, दिलीपजी जांभुळकर, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा