शिवनेरी गडावर स्वच्छता मोहीम यशस्वी; दुर्ग संवर्धन संस्थेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

93
Cleanliness drive at Shivneri Fort successful; Spontaneous response to the initiative of the Fort Conservation Society
शिवनेरी गडावर स्वच्छता मोहीम यशस्वी ; दुर्ग संवर्धन संस्थेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune Shivneri : महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने ‘दुर्ग शिवनेरी दुर्ग सफर व स्वच्छता मोहीम’ हा उपक्रम दिनांक ९ मार्च रविवारी शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मोहिमेत दुर्गप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. गड परिसरात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य कचऱ्याची मोहीम राबविण्यात आली. गडावर प्लास्टिक बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आढळून आल्याने या मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांनी ७ ते ८ बॅग्स प्लास्टिक जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.

महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने 'दुर्ग शिवनेरी दुर्ग सफर व स्वच्छता मोहीम’ हा उपक्रम दिनांक ९ मार्च रविवारी शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मोहिमेत दुर्गप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता यांचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थित दुर्ग सेवकांनी गडाच्या स्वच्छतेसोबतच पर्यटकांमध्ये जनजागृती देखील केली. भविष्यात गड स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी अशा मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. संस्थेच्या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्व सहभागी दुर्ग सेवक आणि सेविकांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा