इंदापूर तालुक्यातील परप्रांतीयांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा

इंदापूर, दि.७ मे २०२०: कोरोनामुळे महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना आपल्या घरी परत जाण्यासाठी आरोग्य तपासणी करून कागदपत्रांची योग्य पूर्तता करून परत जाण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

याच धर्तीवर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये शेकडो परप्रांतीय मजूर काम करीत होते. मात्र लॉकडाऊन वाढल्याने तसेच हातचे काम देखील गेल्याने मजुरांना घराची ओढ लागली होती. त्यामुळे येथील शेकडो मजुरांनी लोणी देवकर येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये जाऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून वैद्यकीय दाखला प्राप्त केला.

तसेच ग्रामपंचायतीमार्फत त्या मजुरांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तसे पत्र देण्यात आले. लोणी देवकर येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये बुधवारी जवळपास १०० हून अधिक मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे त्यांचा घरी जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मजुरांना घरी जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल तोरवे, उपसरपंच विजय डोंगरे, ग्रामसेवक तुकाराम शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद यादव, आरोग्य सेवक भाऊसाहेब खबाले तसेच आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा