इंदापूर, दि. १० जुलै २०२०: जमिनीची नोंद लावण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना इंदापुरच्या तहसील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पडकले.
नितेशकुमार धोंडीबा धर्मापुरीकर या लिपिकाला लाच घेताना पकडण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदारांच्या जमिनीचे वाटप झाले होते. मात्र त्याची नोंद लागलेली नसल्याने संबंधित तक्रारदाराने इंदापुरच्या तहसील कार्यालयात पाठपुरावा केला होता.
मात्र लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर याने या कामासाठी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाकाकडे तक्रार केली आज शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित तक्रारदारासमवेत लाचेची मागणी होत असल्याबद्दल शहानिशा केली. संबंधित लिपिक आणि तक्रारदार यांच्यात तडजोड होऊन १ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार लोकसेवक नितेशकमार धर्मापरीकर याना लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या कारवाई नंतर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे