CM केजरीवालांचं PM मोदींना पत्र

नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर २०२२: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला आवाहन करत भारतीय चलनावर गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असायला पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान, आत्ता अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटा संदर्भात पत्र लिहिले आहे.

सीएम केजरीवाल यांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्राचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, मी १३० कोटी भारतीयांच्या वतीनं पंतप्रधानांना पत्र लिहून भारतीय चलनावर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी-गणेशजींचा फोटो लावावा, अशी विनंती केली आहे.

तसेच पुढे पत्रात लिहतात की, आदरणीय पंतप्रधान देशातील १३० कोटी जनतेची इच्छा आहे की, भारतीय चलनावर गांधींचा फोटो असावा आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश आणि माता लक्ष्मीचा फोटो असावा. आज देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भारताची गणना विकसनशील आणि गरीब देशांमध्ये केली जात आहे, असे केजरीवालांनी पत्रात लिहिले आहे.

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. “दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आला असून अनेकांशी आपली याबाबत चर्चा झाली आहे. कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवे आहेत. अशी मागणी केजरीवालांकडून करण्यात आली तर आज पत्र देखील मोदींना पाठवण्यात आले आहे. तर केजरीवालांकडून गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात येत असल्याचे विरोधी पक्षा कडून बोलले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा