‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना! योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने आता ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे. येत्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबपोर्टलवर महिलांना घरबसल्या ई-केवायसी करता येईल. यासाठी तुमच्याजवळ फक्त आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. पोर्टलवर आधार क्रमांक टाकताच, तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी (OTP) येईल, तो टाकला की तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
सध्या सर्व्हरवर गर्दी असल्याने काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी, घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्व लाभार्थी महिलांना दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, लवकरात लवकर ई-केवायसी करून योजनेचा लाभ सुरू ठेवा.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे













































