सिल्लोड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर ३ ऑगस्ट २०२४ : सिल्लोड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ महिलांना प्रदान करण्यात आले. दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही करण्यात आली.

या भव्य सोहळ्यास पालकमंत्री अब्दुल सत्तार, विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, आ.प्रदीप जयस्वाल, आ.रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांची विक्रमी उपस्थिती होती.

न्युज अनकट प्रतिनीधी : सचिन साबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा