कोरोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्र्यांची विठ्ठलाकडे प्रार्थना

पंढरपूर, दि. १ जुलै २०२०: बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची पूजा केली. यावेळी त्यांचे दोन्ही पुत्रही या महा पूजेत सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे राज्याला कोविड -१९ मुक्त करण्याची मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पूजेच्या वेळी त्यांनी विठ्ठलाला देश, राज्य आणि संपूर्ण जगातील कोरोना नष्ट करण्यास सांगितले आणि आजच या महामार्गाचा नायनाट करा असेदेखील त्यांनी विठ्ठलाकडे मागणी केली. ते पुढे म्हणाले की, मी माऊलींचा चमत्कार या आधीही अनेक वेळा पाहिला आहे आणि आता तो पुन्हा एकदा पाहण्याची माझी इच्छा आहे.

या महापूजा नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाथर्डी येथील रुक्मिणी मंदिराची देखभाल करणार्‍या ज्ञानदेव बडे आणि त्यांच्या पत्नीलाही सन्मानित केले.

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर पांढर्‍या आणि गुलाबी फुलांनी सजविण्यात आले होते. कोरोना संक्रमणाच्या काळात ८०० वर्ष जुनी परंपरा बदलली आहे. पंढरपुरात दरवर्षी कोट्यवधी लोकांचा मेळावा होत असतो, परंतु यावेळी फक्त पासधारकांनाच इथे येण्याची परवानगी होती. मंदिर परिसरात पोहोचलेल्या लोकांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले. नियमांचे योग्य पालन केले जावे यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. संपूर्ण मंदिर परिसर गुलाबी, पांढर्‍या आणि जांभळ्या फुलांनी आणि एलईडी लाइटांनी सजला होता.

आठशे वर्षाच्या परंपरेमध्ये तिसऱ्यांदा लावली गेली भाविकांवर बाबंदी

८०० वर्षांपासून सुरू असलेल्या या अनोख्या पालखी प्रवासात भाविकांची संख्या तिसऱ्यांदा मर्यादित करण्यात आली आहे. यापूर्वी सन १९१२ मध्ये प्लेगमुळे आणि १९४५ मध्ये दुसर्‍या महायुद्धामुळे पंढरपुरात भाविकांची संख्या कमी झाली होती. सन २०१९ मध्ये सुमारे ५ लाख लोक आणि ३५० दिंडी प्रवासात सहभागी झाले होते. जुन्या परंपरेनुसार महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांची पालखी घेऊन पंढरपुरात येतात. ठाकरे परिवार या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा