झारखंड, दि. १८ जुलै २०२०: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून दोन वेग वेगळ्या मेलवरुन हि धमकी आल्याचे समजत आहे. धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा एजेंसीज् या सतर्क झाल्या आहेत.
सुरक्षाकर्मीनी रांची सायबर ठाण्यात दोन वेग वेगळे गुन्हे दाखल केले असून. हे गुन्हे दाखल झाल्या नंतर सायबर ठाण्याच्या पोलिस आधिका-यांनी याचा तपास करण्यास सुरवात केली आहे. CID ने देखील घटनेला गांभीर्याने घेत दोन्ही गुन्ह्यांची केस आपल्या हाती घेतले असून अनेक गोष्टींच्या तपासाला ते लागले आहेत.
तसेच धमकी भेटल्यानंतर सीएम हेमंत सोरेन यांच्या सुरक्षा रक्षकांना अलर्ट केले असून. सीएम जर कुठे बाहेर जात असतील तर त्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांचा गराडा असणार असे आदेश देखील देण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी