सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी देणा-यास अटक

मुंबई, दि. २५ मे २०२०: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला शनिवारी महाराष्ट्र एटीएसने अटक केली. या युवकाने योगी आदित्यनाथ यांना धमकी दिली होती त्या कारणास्तव पोलिसांनी त्याला अटक केली होती. परंतु आता त्याला सोडवण्यासाठी आणखीन एक धमकी पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता या घटनेला एक नवीन वळण मिळाले आहे.

विशेष म्हणजे या पूर्वी धमकी देणाऱ्या युवकास महाराष्ट्र एटीएसनेही अटक केली आहे. या २० वर्षीय युवकास नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. शनिवारी एटीएसने २५ वर्षीय कामरान खानला धमकीच्या प्रकरणात मुंबईतून अटक केली. यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी कामरानने दिली होती. कामरानला सोडण्यासाठी नवी धमकी आता समोर आली आहे.

रविवारी अटक करण्यात आलेल्या २० वर्षीय तरूणाचे नाव सय्यद वहाब असे आहे. सय्यद हा दारुसलाम कॉलनी, मदिना चौक, नाशिक येथील रहिवासी आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कामरान याला शनिवारी अटक करण्यात आली. २२ मे रोजी त्यानी लखनौ पोलिस मुख्यालयात कार्यरत सोशल मीडिया मदत डेस्कला फोन केला आणि बॉम्बस्फोटात त्यांनी उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांना ठार मारणार असल्याचे सांगितले. या धमकी देणाऱ्या फोनबाबत गोमती नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी आरोपी कामरानला न्यायालयात हजर केले असता त्याला ट्रांजिट रिमांड देण्यात आले. कोर्टाच्या आदेशानंतर कामरानला यूपी एसटीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा