नागपूर, १८ ऑगस्ट २०२३ : गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात सर्वाधिक १२० रुपये प्रति किलो असे दर असलेल्या सीएनजीच्या दरात आज घसरण झाली. उपराजधानीतील सीएनजी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज नागपुरात ८९.९० रुपये प्रति किलो या दराने सीएनजी विक्री केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी ९९.९० अर्थात १०० च्या घरात सीएनजीचे दर पोहोचले होते. महागाई वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरात कुठालाही मोठा दिलासा मिळत नसतांना सीजीएनच्या दरात झालेली ही कपात नागपूरकरांसाठी चांगली बातमी म्हणता येईल. सध्या नागपुरात सीएनजी ट्रक टँकरच्या माध्यमातून येत असला तरी भविष्यात सीएनजी गुजरात वरुन मुंबई मार्गे नागपुरात थेट गॅस पाईप लाईनने येणार आहे.
यावेळी तो अर्थातच अधिकच कमी किंमतीत उपलब्ध होईल. असा विश्वास सीएनजी विक्रेत्यांना आहे. महागाईच्या काळात सीएनजीचे दर काही प्रमाणात का होईना कमी झाल्याने, दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया सीएनजी वाहन चालक अंकुश गेडाम यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर