पुण्यात सीएनजी पंप चालक संपावर, पुणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पुणे, २७ जानेवारी २०२३ : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. सीएनजी वाहने वापरणाऱ्यांना आज अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण आज ( दि. २७) मध्यरात्रीपासूनच पुण्यातील सीएनजी पंपचालक संपावर गेले आहेत. हा संप अनिश्चित काळासाठी सुरु राहणार आहे. टोरंट कंपनीने नफ्याचे वाटप न केल्याने पंप चालकांनी संपाची घोषणा केली आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सीएनजी पंप बंद राहणार आहेत.

महानगर नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या सेवा पुणे शहरात सुरू राहतील. मात्र टोरेंट कंपनीच्या डीलर्सनी सीएनजीची खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने १ नोव्हेंबर २०२१ रोजी CNG विक्रीतून नफ्याच्या वितरणाबाबत सुधारित यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतरही टोरंट कंपनीने एक रुपयाचीही वाढ केली नाही. त्यामुळे पंपचालक आणि डीलर्सना संपावर जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. नफ्याचा वाटा न दिल्याने प्रत्येक सीएनजी पंपचालकाला २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सीएनजी ऑपरेटर्सचे म्हणणे आहे. त्यामुळे सीएनजी पंप चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे सीएनजी पंप चालकांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे टोरेंट कंपनी आणि सीएनजी पंपचालकांमध्ये सुरू झालेल्या या वादाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. त्यानंतरही पुणे शहरात एमएनजीएलची सेवा सुरू झाली असली तरी ग्रामीण भागात टोरेंट कंपनीचे बहुतांश पंप विस्तारले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा