गोल पोस्ट गुन्हा नालासोपाऱ्यात १० लाखांचं कोकेण जप्त; नायजेरियन आरोपीला अटक

नालासोपाऱ्यात १० लाखांचं कोकेण जप्त; नायजेरियन आरोपीला अटक

नालासोपारा, २७ मार्च २०२३: नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नालासोपारा पूर्व परिसरातून एका नायजेरियन व्यक्तीला अटक केलीय. त्याच्याकडून लाखो रुपयांचे कोकेण नावांचं ड्रग्ज सापडलंय. काही दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरात तुळींज पोलिसांनी एका नायजेरियनकडून ५८ लाख ७४ हजार रुपयांच्या अमली पदार्थांच्या साठा जप्त केला होता.

त्यानंतर नालासोपारा पूर्वकडील मोरेगाव तलाव येथे तुळींज पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनी ५४ वर्षीय नायजेरियन व्यक्तीला कोकेण ड्रग्जसह अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियन व्यक्ती कोकेण विकण्यासाठी आला होता. एका गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत पोलिसांनी त्याला पकडलंय.

ओके चिमा गॅम्ब्रिल अंगू असं आरोपीचं नाव आहे. या नायजेरियन आरोपीकडून १० लाख ४० हजार रुपये वजनाचं कोकेण जप्त करण्यात आलंय, आरोपी नायजेरियन विरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूढील तपास पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version