झुरळांच्या वावरामुळे त्रस्त आहात? हे आहेत साधे उपाय

१) साखरेचे पीठ आणि खाण्याचा सोडा समप्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण करा आणि मिश्रणाची पूड झुरळ झालेल्या ठिकाणी टाका. साखरेकडे झुरळ आकर्षित होतील आणि सोडा खाल्ल्यामुळे मरुन जातील.                                  २) झुरळ झालेल्या ठिकाणी काकडी कापून टाकल्यास तिच्या वासानेच झुरळ पळून जातील.
३) मसाल्यामधील तमालपत्राच्या पानाचा वास उग्र असतो. या पानांचा चुरा करुन झुरळ झालेल्या ठिकाणी टाकल्यास त्याच्या उग्र वासाने घरातील झुरळ निघून जातील.
४) कडुनिंबाचे एक चमचाभर तेल स्प्रे-बॉटलमध्ये टाकुन त्यात पाणी भरा आणि झोपण्यापूर्वी झुरळ झालेल्या ठिकाणी फवारा किंवा कडुनिंबाच्या पानाची पूड झुरळ झालेल्या ठिकाणी टाका; झुरळ निघून जातील.
५) पुदिन्याची ताजी पाने किंवा पुदिन्याची पाने टाकुन उकळलेले पाणी झुरळ झालेल्या ठिकाणी टाकल्यास झुरळ निघून जातील.                                                                                                                          ६) वाटीत कॉफी आणि पाणी घेऊन झुरळ झालेल्या ठिकाणी ठेवल्यास झुरळ कॉफीच्या वासाने त्याकडे आकर्षित होतात आणि त्यात पडून मरुन जातात.
७) झुरळ झालेल्या ठिकाणी मसाल्यातील लवंगा ठेवल्यास त्याच्या उग्र वासाने झुरळ पळून जातात.                      ८) झुरळ झालेल्या ठिकाणी रॉकेल ठेवल्यास त्या वासाने झुरळ निघून जातात.                                            ९) याव्यतिरिक्त घरातील कचऱ्याचा डबा बाहेर ठेवावा आणि घरात अन्न सांडू नये. भोजन झाकून ठेवावे. फळांच्या किंवा भाज्यांच्या साली, देठ बराचवेळ घरात ठेऊ नये.                                                                              १०) सांडपाण्याच्या निचऱ्याच्या ठिकाणी जाळी लावावी. घरामध्ये स्वच्छता ठेवावी. वेळच्यावेळी कचऱ्याची विल्हेवाट लावावी.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा