रत्नागिरी ४ डिसेंबर २०२३ : यंदा कोकणात झालेला कमी पाऊस तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव यांमुळे नारळ उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी योग्य पाणी व खतांची मात्रा देऊन उत्पादन स्थिर ठेवावे असे आवाहन भाटे संशोधन केंद्राचे कृषीविद्यावेत्ता डॉ.किरण मालशे यांनी कोकणातील शेतकऱ्यांनां केले आहे.
ते म्हणाले की, नारळ कोकणातील महत्त्वाचे पीक आहे. यावर्षी पाऊस लवकर गेला त्यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यातच बदलते वातावरण, कमी पाऊस याचा परिणाम नारळावर देखील होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी योग्य पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन यांची सांगड घालून उत्पादन स्थिर राखावे. खतांची मात्रा देखील योग्य प्रमाणात शेतकऱ्यांनी घालावी तसेच विविध किडींचा भुंग्यांचा प्रादुर्भाव नारळ पिकावर होत असून शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर