टोकरे कोळी जातप्रमाणपत्रांवर तत्काळ निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे आदेश

जळगाव, १६ फेब्रुवारी २०२३ : टोकरे कोळी समाजाच्या प्रमाणपत्राचा प्रश्न गंभीर बनला असतानाच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जिल्ह्यातील तब्बल १४६० प्रमाणपत्रांबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याने समाजबांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. फैजपूर विभागीय कार्यालयात प्रलंबित असलेल्या १२५० टोकरे कोळी जातप्रमाणपत्रांबाबत; तसेच अमळनेर प्रांत कार्यालयात प्रलंबित असलेले २१० जातप्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे जळगाव व भुसावळ परिसरातील भालशिव, प्रिंपी, कोळन्हावी, शिरावल या गावांतील; तसेच अमळनेर भागातील टोकरे कोळी समाजबांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी जमातीला जातप्रमाणपत्र मिळण्याबाबत अडचणी येत होत्या. त्यामुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित होती. याबाबत सर्व समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.

यावेळी धरणे आंदोलनाची सांगता करताना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बैठक घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेत फैजपूर प्रांत कार्यालयाकडे १२५० प्रकरणे, तर अमळनेर प्रांत कार्यालयाकडे २१० टोकरे कोळी जमातीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची बाब समाजाचे पदाधिकारी मदन शिरसाठे यांनी लक्षात आणून दिली होती. त्यावरही तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा